नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून मोठं मोठे पक्ष आपल्या आमदार-खासदारांना पंचतारांकित हॉटेल मध्ये ठेवतात याचे अनेक उदाहरणे आतापर्यंत निदर्शनास आलीय. मात्र असाच काहीसा प्रकार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकित समोर आला आहे. त्यामुळेच नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा होत आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपले मतदार फुटू नयेत म्हणून ‘शेतकरी विकास पॅनल’ने नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटलेमध्ये मतदारांची राहण्याची सोय केली होती. या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं हे १० हजार पर्यंत आहे. आज या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. आज या सर्व मतदारांना आपापल्या मतदान केंद्रावर बसच्या माध्यमातून नेण्यात येत आहे. माजी खासदार देविदास पिंगळे आणि बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यात अटी-तटीची लढाई आहे. त्यामुळेच मतदारांना पंचतरिक हॉटेलमध्ये व्ही. आय. पी ट्रीटमेंट मिळालीय.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651883496342978560?s=20
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारसंघातील शेतकरी विकास पॅनलच्या सर्व मतदारांना बसच्या माध्यमातून नाशिक-मुंबई हायवेवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काल सायंकाळी मुक्कामाला नेण्यात आले होते. आपले मतदार फुटू नयेत हा यामागचा उद्देश होता. या सर्व मतदारांची राहण्याची-खाण्याची सोय हॉटेलमध्ये शेतकरी विकास पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका एका रुममध्ये ६ ते ७ मतदार ठेवण्यात आले होते. यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी असून निकाल काय लागतो, कोणाते पॅनल निवडणुकीत बाजी मारते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651883438675496963?s=20
Nashik APMC Election Voter Five Star Facility