नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच कंत्राटी शिपाई सुद्धा लाचखोर बनल्याचे निदर्शनास येत आहे. साहित्यरत्न आण्णा भाऊसाठे विकास महामंडळातील कंत्राटी अस्थायी शिपाई दत्ता मारोती घोडे याने ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच स्विकारताना तो रंगेहाथ पकडला गेला. यासंदर्भात लाचलुपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माहिती दिली आहे. ती खालीलप्रमाणे
युनिट -* नाशिक.
तक्रारदार-* पुरुष, वय 53 वर्षे, रा. नाशिक
आरोपी-* १) दत्ता मारोती घोडे , वय ३० वर्षे, हुद्दा – कंत्राटी अस्थायी शिपाई, साहित्यरत्न आण्णा भाऊसाठे विकास महामंडळ, नाशिक. (खाजगी इसम)
लाचेची मागणी-* ३,०००/-रुपये
लाचेची मागणी तारीख- २३/०३/२०२२
लाच स्वीकारली -* ३,०००/-
लाच स्वीकारली तारीख-* २३/०३/२०२२
लाचेचे कारण
तक्रारदार यांचा मुलगा सुशिक्षित बेरोजगार असून त्याने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, नाशिक येथे छोटा हत्ती खरेदीसाठी ४,७१,४०१/- रुपये चे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला असल्यामुळे आरोपी खाजगी इसम याने शासकीय कार्यालयातील त्याच्या ओळखीचा व त्याच्या नावाचा तक्रारदार यांना प्रभाव दाखवून ३०००/-रु लाचेची मागणी करून, तिचा स्वीकार केला म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा अधिकारी
श्रीमती साधना इंगळे ,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक.
सापळा पथक
पो.हवा/ सचिन गोसावी,
पो.ना . राजू गिते
पो. ना. शरद हेंबाडे, चा.पो.हवा. संतोष गांगुर्डे,
सर्व नेमणूक- ला.प्र.वि. नाशिक.
मार्गदर्शक
1)* मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2)मा.श्री.नारायण न्याहळदे सो. अप्पर पोलीस अधीक्षक,
ला. प्र. वि. नाशिक
३)मा.श्री.सतीश भामरे (वाचक) पोलिस उप अधीक्षक., ला. प्र. वि. नाशिक.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक टोल फ्री क्रं. 1064