त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळी सुट्यांमुळे शहर परिसरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, योग्य ती खबरदारी न घेतल्याने काही दुःखद घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. अंजनेरी परिसरात ३ मित्र पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. यातील दोन मित्रांचा मृत्यू झाला असून एकाला वाचविण्यात यश आले आहे.
अंजनेरी येथे फिरण्यासाठी आलेल्या मामा सह भाच्याचा अंजनेरी धरणात बुडून मृत्यू झाला तर एका भाच्याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी प्रसाद बाळासाहेब झगरे (वय 22 वर्षे, रा. शिवाजी नगर, औरंगाबाद), वैभव वाल्मीक वाकचौरे (वय 14 वर्ष, रा. तळेगाव रोही, ता. चांदवड) आणि प्रतीक मच्छिंद्र वाकचौरे (वय 14 वर्षे) हे तिघे अंजनेरी येथे फिरायला आले होते. पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह ना आवरल्याने ते पाण्यात उतरले परंतु दुर्दैवाने मामा प्रसाद, भाचा वैभव आणि प्रतीक पाण्यात बुडु लागले. हे पाहून तेथे पोहत असलेल्या इतरांनी प्रतीक यास वाचविले परंतु इतर दोघांना वाचविण्यास त्यांना अपयश आले.
प्रसाद ला पण लागलीच बाहेर काढले होते परंतु तो वाचू शकला नाही तर वैभव याची बॉडी आज दिनांक 1 मे रोजी काढण्यात आली त्यासाठी सिन्नर बेलुचे येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तुपे यांच्या मदतीने काढण्यात आले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पो. नि. बिपिन शेवाळे, पो ना. रुपेशकुमार मुळाणे, गंगावणे, राठोड यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती हाताळली.
दरम्यान प्रतिक चे वडील महाराष्ट्र पोलीस असून गंगापूर पोलीस चौकीत कार्यरत आहेत. आणि मामा प्रसाद आणि भाचा वैभव हे त्यांच्याकडे शिकण्यासाठी राहतात सुट्टी असल्यामुळे ते फिरण्यासाठी अंजनेरी येथे आले आणि अशी दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Nashik Anjaneri 3 Youths drown in Lake 2 Dead