शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये या भागात पाणीप्रश्न गंभीर; ‘शिवसेना, सत्कार्य’चे नागरिकांसह जलकुंभावर चढून आंदोलन

by India Darpan
जून 4, 2025 | 7:01 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250604 WA0297

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रभाग क्रमांक २४ मध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कर्मयोगीनगर येथे बांधण्यात आलेल्या नवीन जलकुंभातून पाणी पुरवठा करून टंचाई दूर करा, अशी मागणी करीत बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनसह नागरिकांनी मोर्चा काढला. या जलकुंभावर चढून आंदोलन केले. महापालिका अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गोविंदनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, जगतापनगर, जुने सिडकोसह प्रभाग २४ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून तीव्र पाणी टंचाई आहे. अनेकदा निवेदने देवून, रस्त्यावर उतरूनही ही समस्या सुटत नाही. सहा दिवसांपूर्वी महापालिका पाणी पुरवठा अधिकार्‍यांची भेट घेण्यात आली, तरीही यात सुधारणा झाली नाही. आज बुधवारी, ४ जून रोजी शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली हंडे, भांडे घेवून नागरिक रस्त्यावर उतरले. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, पाणी चोरांवर कारवाई करा, पाणी नाही तर घरपट्टी-पाणीपट्टी नाही, अशा घोषणा देत नागरिक कर्मयोगीनगर येथील जलकुंभावर पोहोचले. जलकुंभावर चढून पाणी टंचाई दूर करण्याची मागणी करण्यात आली. महापालिका उपअभियंता हेमंत पठे, जितेंद्र चव्हाण, नाना गायकवाड, किरण साठे आदींनी आंदोलकांशी चर्चा केली. शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनीही या अधिकार्‍यांशी चर्चा केली. पाणीप्रश्न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

या आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, आनंदा तिडके, राजेश पाटील, बाळासाहेब राऊतराय, महेश जाधव, अविनाश कोठावदे, जयदीप पेंढारकर, देवीदास तांबोळी, विनोद पोळ, हेमंत नेरकर, किरण काळे, अशोक पाटील, साधना देशमुख, ज्योती देशमुख, योगिता गहिवड, रुपाली मुसळे, भारती चौधरी, अमृता नेरकर, शिल्पा मुळे, नंदिनी जाधव, विशाखा थोरात, अवनी कुलकर्णी, कविता कोठावदे, श्वेता काळे, तेजस्विनी पवार, अनिता आमटे, संगीता देशमुख, रमेश शिंदे, प्रथमेश बडगुजर, योगेश नेरकर, प्रकाश देशमुख, शशीकांत मोरे, रामदास चौधरी, संग्राम देशमुख, अमोल विसपुते, हेमंत चव्हाण, पुरुषोत्तम शिरोडे, मनोज पाटील, राजेंद्र भुसारी, दत्तात्रय बाचकर, दत्तात्रय चासकर, संदीप गहिवड आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

IMG 20250604 WA0298
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुधाकर बडगुजर यांचे सलिम कुत्तासोबत संबध, १७ गुन्हे…भाजपमध्ये घेण्यास सीमा हिरे यांचा विरोध

Next Post

पुण्या- मुंबईत पोहोचलेल्या मान्सूनची ही आहे स्थिती…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

Next Post
rain1

पुण्या- मुंबईत पोहोचलेल्या मान्सूनची ही आहे स्थिती…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

ताज्या बातम्या

Nitesh Rane

उध्दव आणि राज एकत्र येणार असल्याच्या चर्चेची नितेश राणे यांनी उडवली खिल्ली…केला हा मोठा दावा

जून 7, 2025
Untitled 16

ईडीने या सहकारी बँकेचे अध्यक्ष व त्यांच्या पत्नीची १३.९१ कोटी मालमत्ता केली जप्त

जून 7, 2025
GsxTI gWkAAZGF9

कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तानसह या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट…हे आहे कारण

जून 7, 2025
Untitled 19

युतीची चर्चा सुरु असतांना मुंबईत मनसेचा एकमेक नगरसेवक फुटला…शिंदेकडून राज ठाकरेंना मोठा धक्का

जून 7, 2025
dhanushayban

नाशिक जिल्ह्यातील टँकर निविदेत छोट्या व्यवसायिकांवर अन्याय…निविदा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

जून 7, 2025
Untitled 18

मुक्ताईनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पालखीचे सारथ्य…

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011