सुदर्शन सारडा, नाशिक
नाशिक :नाशिकचे ओझर विमानतळ टर्मिनल वरून शुक्रवारी तब्बल बाराशेच्या वर प्रवाश्यांनी ये जा केल्याने नाशिकचे हवाईबळ सिध्द होऊन गेले आहे.
अप डाऊन फ्लाईट द्वारे सुमारे सहाशेच्या वर प्रवाश्यांनी ये जा केल्याने केंद्र शासनाने आगामी काळात जाहीर केलेली अंतरराष्ट्रीय विमानसेवेला प्रतिसाद लाभेल हे प्रवाशांच्या प्रतिसादातून स्पष्ट झाले आहे.
नाशिक ही कुंभनगरी आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, काळाराम मंदिर,सितागुंफा,गोदावरी येथेच आहे.अध्यात्मिक दृष्ट्या शहराला जागतिक दर्जा आहेच परंतु औद्योगिक बाबीत देखील नाशिक नवे अध्याय रचत आहे गेल्या काही वर्षांपासून या सर्वांना हवाई कनेक्टिव्हीटी कुठेतरी कमी पडत होती. सुरवातीच्या काळात एअर डेक्कन, किंगफिशरची ओझरला विमान सेवा सुरूही झाली पण त्यात मोठा नियोजनाचा अभाव दिसून आला. त्यानंतर २०१४ च्या निवडणूक आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला सुसज्ज ओझर टर्मिनल प्रवासी वाहतुकीसाठी खुले झाले तरी देखील अनेक वर्ष नाशिक विमानतळ विजनवासात होते. अखेरीस केंद्र सरकारच्या उडाण योजनेअंतर्गत त्याला बूस्टर मिळाला. इंडिगोने सकारात्मक दृष्टीकोन ठेवत सुरवातीला पुणे, मुंबईसाठी सुरू झालेली सेवा पुन्हा स्लॉटमुळे बंद झाली. परंतु नाशिकच्या प्रवाशांच्या वाढत्या मागणीला अनुसरून अनेक चाचपण्या झाल्या. त्याचा अभ्यास करत आज अहमदाबाद, दिल्ली,गोवा, बेंगलोर, इंदोर,नागपूर,हैद्राबाद साठी सेवा सुरू आहे.त्यास प्रवाशांच्या प्रतिसाद मिळत आहे.
घोषित झालेल्या काही अंतरराष्ट्रीय विमानसेवा दृष्टिक्षेपात आहे. त्यालाही नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास सर्वच क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मुंबईहून विमान गाठण्यासाठी लागणारा वेळ व इतर खर्चिक बाबी लक्षात घेता आगामी काळात नाशिक हे सर्वार्थाने योग्य ठिकाण असल्याचे मत राजकीय, सामाजिक, उद्योग, आयटी क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.या बाबींना भविष्यातील धास्ती राजकीय कंगोऱ्याची आहे त्यासाठी निर्णयक्षमता असलेल्यांनी सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू ठेवत अशीच एकसंघता पाळणे गरजेचे आहे तेवढे जरी झाले तरी नाशिकने खूप काही पदरात पाडले म्हणून समजण्यात कोणतीही हरकत नाही.
पहिल्याच दिवशी नम्मा बंगळुरू
मंगळवारी बंगळुरूसाठी ओझर हून सेवा सुरू झाली. दुपारी अडीच वाजता नशिकसाठी टेक ऑफ केलेले विमान साडेचार वाजता नाशकात उतरले त्यात १८९ प्रवाश्यांनी नाशिक गाठले तर बेंगळुरूसाठी १७८ जणांनी उड्डाण केले. सदर आकडे पाहता देशात इतर ठिकाण साठी विमानसेवा सुरू झाल्यास त्यालाही चांगला प्रतिसाद लाभेल असा कयास असून इंडिगो ने अशाच प्रकारे चाचपणी करून येत्या कुंभ मेळ्याच्या डोळ्यासमोर ठेऊन नाशिकची हवाई जोडणी देशभर करावी अशी मागणी कायम आहे.