नाशिक – ओझर येथील नाशिक विमानतळावरुन पुन्हा विमानसेवा सुरू झाली आहे. कोरोना संसर्गाच्या निर्बंधांमुळे विमानसेवा स्थगित करण्यात आली होती. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे दिल्ली-अहमदाबाद-नाशिक ही सेवा सुरु झाली आहे. १२ जुलैपासून सेवा सुरू करण्याचे यापूर्वीच जाहिर केले होते. विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रुजेट (नाशिक-अहमदाबाद) आणि स्टार एअर (नाशिक-बेळगाव) या कंपनीच्या सेवाही लवकरच सुरू होणार आहेत. त्याचे बुकींग सध्या सुरू आहे.