नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जून महिना राज्यात पावसाने दडी मारल्याने कोरडा गेला, तरी जुलै उजाडताच पावसाला सुरुवात झाली, आणि सुमारे पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाने वरुणराजाने कृपादृष्टी केली. साहजिकच सर्वत्र नद्या नाल्यांना पूर येऊन धरणे देखील भरली. नाशिक जिल्ह्या देखील अशीच परिस्थिती असून पावसामुळे बहुतांश धरणे फुल्ल झाली आहेत, धरण साठ्यात वाढ झाल्याने पिण्यासाठी, उद्योगासाठी आणि शेतीसाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
सध्या गोदावरी आणि दारणा धरणातून अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरूच असून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे हे पाणी झेपावत आहे. त्यामुळे जायकवाडी धरण देखील निम्म्यापेक्षा जास्त भरले असून मराठवाड्याची तहान भागणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरण देखील अनेक वर्षानंतर यंदा प्रथमच जुलै अखेर भरल्याने नाशिक सह जळगाव जिल्ह्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार व संततधार पावसाने जिल्ह्याचा पाणीसाठा ८१ टक्क्यांवर गेला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा तब्बल ५२ टक्क्यांनी वाढलाय. जिल्ह्यातील २३ पैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. उर्वरित १३ धरणांचा जलसाठा ५० टक्क्यांवर आहे. गंगापूर धरणही ६५ टक्के भरल्याने नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट दूर झाले आहे. विशेष म्हणजे नाशिकहून जायकवाडीच्या दिशेने आतापर्यंत २९.१०९ टीएमसी एवढे पाणी झेपावल्याने जायकवाडी धरण सुमारे ७५ टक्के भरले आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. इगतपुरी, त्रंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यातील धरण क्षेत्राच्या परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नांदूर मधमेश्वर धरणातून 27 हजार 980 क्युसेक पूर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे नद्यांना पूर
आला असून या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नाशिक आणि नगर जिल्ह्यातून अतिरिक्त पाणी देण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्हात गेल्या १५ दिवसांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नाशिक जिल्हातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली असून जिल्हातील अनेक नद्यांना पूर देखील आला. शेतीचेही काही ठिकाणी मोठे नुकसान झाले. नाशिक शहरामध्ये मात्र या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कारण गंगापूर धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट उभे होते. मात्र, मागच्या पावसामुळे नाशिककरांवरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो होतआहेत. दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण ओव्हरफ्लो झाले असून आता वाघाड धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठे व दिंडोरी तालुक्यासह निफाड, येवला, मनमाड तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याची ताहान भागवणारे करंजवण धरण ९९ टक्के भरले असून करंजवण धरणातून पाणी कादवा नदीपात्रात सोडण्यात आले.
मांजरपाडा ( देवसाने) प्रकल्प परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव धरणही ८५ भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आले असून तिसगाव धरण ९२ टक्के भरले आहे. तालुक्यातील करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेंड तीसगाव या सर्व धरणातील नद्याचे पालखेड धरणामध्ये येत असल्यामुळे पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग कादवा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
नाशिक शहरात पावसाचा जोर कमी झाला असून जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर पट्ट्यात पावसाची सत्ताधार सुरूच आहे. यामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नांदुरमाध्यमेश्वर, पालखेड सह इतर काही धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यातील महत्वाची धरणे तुडुंब भरली आहेत. पावसामुळे दारणा, भावली, गंगापूर, पालखेड, कडवा, करंजवण, ओझरखेड, वाघाड, पुणेगाव आदी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये एकूण ७५ टक्के पाणीसाठा उपलबध झाला आहे. आतापर्यंत आळंदी, वाघाड, ओझरखेड, हरणबारी, केळझर हि धरणे १०० टक्के भरली आहेत. गेल्या पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. यावर्षीही हीच परिस्थिती आहे.
Nashik Ahmednagar Water Discharge Jaykwadi Dam Flood Rain