रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकच्या आधाराश्रमातील आशीला मिळाले अमेरिकन पालक; जिल्हाधिकाऱ्यांनीच केले स्वाधीन

फेब्रुवारी 14, 2023 | 4:00 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230214 WA0011

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  येथील आधाराश्रमातील आशी या बालिकेला अमेरिकेच्या दाम्पत्याने दत्तक घेतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी सोहळ्यात या दाम्पत्याकडे आशीला सोपविण्यात आले. हा प्रसंग अतिशय भावूक असाच होता. सरकारी अधिकाऱ्यांसह आधाराश्रमातील कर्मचारीही यावेळी कुतुहलाने आशीकडे आणि तिच्या नव पालकांकडे पाहत होते.

महिला व बालविकास विभागाच्या मान्यताप्राप्त आधाराश्रमात अनाथ व निराधार बालकांच्या संगोपन व पुर्नवसनाचे कार्य करण्यात येते. केंद्रीय दत्तक ग्रहन संसाधन (सी.ए.आर.ए) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रेग्युलेशन 2022 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार आज जिल्ह्यातील आधाराश्रम संस्थेतील कुमारी आशी या बालिकेला जमशेदी या परदेशी दाम्पत्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या उपस्थितीत दत्तक घेतले आहे, अशी माहिती आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहुल जाधव यांनी दिली आहे.

आज जिल्हाधिकारी यांच्या कक्षात कुमारी आशी हिला दत्तक बालिका संदर्भातील कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून डेविन जमशेदी व लायनी जमशेदी यांच्या स्वाधीन करण्यात आले. श्री व सौ जमशेदी हे कुटुंब युएसए येथील रहिवाशी असून या दाम्पत्यांस यापूर्वी एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी बालके आहेत. कुमारी आशी हिला जन्मत: एकच किडनी असून तिची जीभ टाळूला चिटकलेली असल्याने त्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

दत्तक नियमावलीनुसार असे बालक विशेष काळजी घोषित केले जात असून ते परदेशी पालकांना दत्तक म्हणून दिले जाते. त्यानुसार जमशेदी दाम्पत्याला जुळी बालके असतांना देखील त्यांनी विशेष काळजीचे बालक दत्तक घेण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मागील 8 महिन्यांपासून ही प्रक्रिया सूरू होती व आज ती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुर्ण करण्यात आली. कुमारी आशी हिच्या रूपाने नवीन दत्तक प्रणाली सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच आंतरदेशीय दत्तक प्रक्रिया नाशिक जिल्ह्यातून पूर्ण झाली आहे. तसेच आजपर्यंत देशांतर्गत या स्वरूपाचे 4 आदेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारित करण्यात आले आहेत, अशी माहिती श्री जाधव यांनी दिली आहे.

कुमारी आशी हिला दत्तक देतेवेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भुषण काळे, आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहूल जाधव यांच्यासह दत्तक पालक डेविन जमशेदी व लायनी जमशेदी उपस्थित होते.

Nashik Adharashram Girl Child got USA Guardians

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ७ प्रस्तावांना मान्यता; केंद्र सरकारची ही योजना आता राज्यात राबवणार

Next Post

अरे व्वा…विहिरीत पडलेल्या मांजरीने जीव वाचवण्यासाठी घेतला बिबट्याचा आधार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
IMG 20230214 WA0212 e1676370607429

अरे व्वा...विहिरीत पडलेल्या मांजरीने जीव वाचवण्यासाठी घेतला बिबट्याचा आधार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011