नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्रेत्यावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात गुटखा, सुंगधीत सुपारीचा साठा जप्त केला. त्यानंतर दुकान सिल, वाहन जप्त केले. अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आडगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत आडगाव येथील देवी खंडेराव मंदिरासमोरील मे. महालक्ष्मी ट्रेडर्स या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी छापा टाकला. यावेळी या दुकानाचे मालक प्रशांत कचरू सावळकर हे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सदर दुकानाची झडती घेतली असता २ हजार ६७५ किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी आढळला. त्यानंतर येथे उभी असलेल्या गाडी क्रमांक एमएच १५ जीएच १६९९ मध्ये पाहणी केली. त्यात रुपये ४५ हजार ७८९ किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आला. त्यानंतर राहत्या घराची झडती घेतली. त्यात १ लाख ४२ हजार ८० रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी आढळून आला असा एकूण १ लाख ५२ हजार ७४४ रुपयाचा इतका प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा सापडला. त्यात विमल पान मसाला, हिरा पान मसाला, राजनिवास पान मसाला, रॉयल ७१७, सुगंधित सुपारी, v1 सुगंधित सुपारी, नखरेवी स्वीट सुपारी, इत्यादीचा साठा मिळाला. या कारवाईत वाहन जप्त करुन अन्न सुरक्षा अधिकारी गो.वि. कासार यांनी पोलिसांच्या दिले.
यावेळी गुटखा साठवणीसाठी पुनर्वापर होऊ नये म्हणून दुकान व सील बंद करण्यात आले.प्रशांत कचरू सावळकर यांनी बंदी असताना गुटखा पानमसाला सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थाची साठवणूक केल्याने आडगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यात आली असून त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागाचे सहायुक्त सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त उ.सी. लोहरकर, मनीष सानप, अन्नसुरक्षा अधिकारी गो.वी. कासार, अमित रासकर, प्रमोद पाटील, अविनाश दाभाडे व श्रीमती सु.दे. महाजन यांचे पथकाने केली.