नाशिक – अहमदनगर येथे राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार घेण्यासाठी जाणाऱ्या कलावंताचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गौळाणे फाट्याच्या वळणावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक संदीप निकम (20, रा. आयुक्त निवास स्टॉप कॉटर्स, नेरूळ, नवी मुंबई) हे त्यांच्या वडिलांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार घेण्यासाठी प्रतिक हा त्याच्या पल्सर मोटारसायकल (एम. एच. 03 डी. ई. 9063) वरून अहमदनगर येथे जात होता. विल्होळी फाटा, जलशुद्धीकरण केंद्रासमोर मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना अज्ञात पांढऱ्या रंगाच्या भरधाव चारचाकीने पल्सर वाहनाला ठोस मारली. त्यात प्रतिकचे वडील संदीप खंडू निकम यांचा मृत्यू झाला. तर प्रतिक गंभीर जखमी झाला. संदीप निकम हे नवी मुंबई महानगरपालिकेत शिपाई या पदावर कार्यरत होते. ते नाट्य कलावंत देखील होते. याप्रकरणी पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक शांताराम शेळके करीत आहेत.