नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव दुचाकी स्पिडब्रेकरवर घसरल्याने ५४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात वडाळा पाथर्डी मार्गावरील सराफ लॉन्स भागात झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
परेशकुमार विश्वमोहन तिवारी (रा.रिध्दीसिध्दी अपा.कर्मयोगीनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तिवारी शुक्रवारी (दि.२२) रात्री एमएच १५ बीके २०६४ या आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. वडाळा पाथर्डीरोडने ते प्रवास करीत असतांना सराफ लॉन्स भागातील स्पिडब्रेकरवर त्यांची दुचाकी आदळली. या घटनेत रस्त्यावर पडल्याने तिवारी गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हवालदार सुरेश भोजणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.