नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकी घसरल्याने ३२ वर्षीय चालक ठार झाला. हा अपघात वडनेरगेट परिसरातील वालदेवी नदीच्या पुलावर झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विक्रम भरत पवार (रा.मिथांशु अपा.दामोदर नगर पाथर्डी फाटा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पवार गुरूवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास दुचाकीवर पाथर्डी रोडने देवळाली कॅम्प येथे जात असतांना हा अपघात झाला. वडनेर गेट परिसरातील वालदेवी नदी पुलावर भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात पवार गंभीर जखमी झाले होते. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ सुविधा हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. आकाश पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.
याबाबत पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बरेलीकर करीत आहेत.