नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात आडगाव शिवारातील रूख्मिनी लॉन्स भागात झाला होता. गेल्या काही दिवसांपासून महिलेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्वेताली निलेश खैरे (रा.मित्रविहार कॉलनी,रूख्मिनी लॉन्स जवळ ) असे मृत महिलेचे नाव आहे. खैरे या गेल्या गुरूवारी (दि.६) सकाळच्या सुमारास रूख्मीनी लॉन्स परिसरातून पायी जात असतांना हा अपघात झाला होता. भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने पती निलेश खैरे यांनी त्यांना तातडीने शताब्दी हॉस्पिटल येथे दाखल केले होते.
गेली दहा बारा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी (दि.१९) उपचार सुरू असतांना डॉ. कपील कापडणीस यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.