नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने १८ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर मार्गावर झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विशाल भिमराव जाधव (रा.शनि चौक,बजरंगवाडी नाशिक पुणे रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. जाधव रविवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास नांदूरनाक्याकडून आपल्या घराकडे दुचाकी एमएच १५ जेझेड ८६२३ या दुचाकीवर जात असतांना हा अपघात झाला. मंजूळा पॅलेस परिसरात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
१०८ अॅम्ब्युलन्स च्या माध्यमातून त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.