नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत २१ वर्षीय कारखाना कामगार असलेला दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात महामार्गावरील आंगण हॉटेल भागात झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुभम राजेंद्र काळे (रा.सिंहस्थनगर,सिडको) असे मृत कामगाराचे नाव आहे. काळे मंगळवारी (दि.७) रात्री औद्योगीक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीत सेवा बजावून आपल्या दुचाकीने घराकडे जात असतांना हा अपघात झाला.
महामार्गावरील आंगन हॉटेल परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. मेव्हणे समाधान गवारे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.









