नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात महामार्गावरील जकात नाका भागात झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिपक लक्ष्मण गांगुर्डे (रा.लिंबोळे ता.चांदवड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गांगुर्डे शुक्रवारी (दि.३०) सायकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर नाशिककडून पिंपळगावच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. दहावा मैल भागतील जकातनाका परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली.
या अपघातात गांगुर्डे गंभीर जखमी झाला होता. गणेश पालवे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.








