नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार झाली. हा अपघात दाडेगाव रोड भागात झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संगिता पोपट गवळी (४८ रा.गवळी मळा, दाडेगावरोड पाथर्डी गाव) असे मृत महिलेचे नाव आहे. गवळी या बुधवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास पाथर्डी गावातून आपल्या घराकडे पायी जात असतांना हा अपघात झाला. दाडेगाव रोडने त्या पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकीने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
कुटुंबियांनी परिसरातील सिग्नस हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ वक्रतुड हॉ्स्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. सागर मंडलिक यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सुनिल गांगुर्डे करीत आहेत.