नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून पडलेल्या ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात वडाळा पाथर्डी मार्गावरील चर्च भागात झाला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अरूणा शशिकांत सोनगिरकर (रा. जगन्नाथचौक इंदिरानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. सोनगिरकर या सोमवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास आपल्या पतीसमवेत दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. सोनगिरकर दांम्पत्य सम्राट स्विटच्या दिशेने प्रवास करीत असतांना चर्च समोर अचानक गाय आडवी आल्याने दोघे दुचाकीवरून पडले होते.
या घटनेत अरूणा सोनगिरकर यांना गंभीर दुखापत झाल्याने मुलगा योगेश सोनगिरकर याने त्यांना लेखानगर येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता दुस-या दिवशी उपचार सुरू असतांना डॉ. भुषण देशमुख यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पगारे करीत आहेत.