नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात द्वारका सर्कल भागात झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोज साहेबराव पवार (रा.शुभ अपा.आकाश पेट्रोल पंपाजवळ,म्हसरूळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पवार गेल्या बुधवारी (दि.१०) रात्री पाथर्डी फाट्याकडून द्वारका भागातून दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. द्वारका सर्कल परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास व कमरेस दुखापत झाल्याने कुटुंबियांनी त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज मध्ये दाखल केले असता सोमवारी (दि.१५) उपचार सुरू असतांना डॉ. विराज शहा यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.