नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्ता ओलांडत असतांना भरधाव अॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार झाले. हा अपघात देवळाली गावातील म्हसोबा महाराज मंदिर परिसरात झाला. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात पसार झालेल्या रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अबलू रामा पवार (७४ रा. वडारवाडी,देवळालीगाव) असे मृत वृध्द व्यक्तीचे नाव आहे. पवार गेल्या बुधवारी (दि.३) सकाळच्या सुमारास देवळाली गावातील म्हसोबा महाराज मंदिर परिसरातील रस्ता ओलाडत असतांना हा अपघात झाला होता. भरधाव एमएच १५ एफयू ६८४३ या अॅटोरिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असून, अपघातानंतर रिक्षाचालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. याबाबत मुलगा बाबू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.