नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकीने कट मारल्याने रिक्षा पलटी होवून एका प्रवाश्याचा मृत्यू झाला. हा अपघात तपोवनातील कृषी गोशाळा ट्रस्ट भागात झाला. या अपघातात रिक्षाचालकही जखमी झाला असून, अॅटोरिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
नाद हरी औटे (६३ रा.राजवाडा टाकळीगाव) असे रिक्षाप्रवासात मृत्यू झालेल्या प्रवाश्याचे नाव आहे. याबाबत जखमी रिक्षाचालक संतोष अशोक बर्डे (रा.आगर टाकळी ता.जि.नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बर्डे गेल्या शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी गोदाघाटावर गेले होते. मित्र नाद औटे यास रिक्षात बसवून ते आपल्या घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. एमएच १५ एफयू ८६९६ या अॅटोरिक्षातून दोघे नवीन स्वामी नारायण मंदिराकडून लक्ष्मी नारायण मंदिराच्या दिशेने प्रवास करीत असतांना तपोवनातील कृषी गोशाळा ट्रस्ट भागात पाठीमागून भरधाव येणा-या मोटारसायकलने रिक्षास कट मारला.
या अपघातात रिक्षाने दुभाजकास धडक देत पलटी झाल्याने पाठीमागील सिटावर बसलेले औटे व चालक बर्डे रस्त्यावर पडले होते. दोघांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डोक्यास वर्मी मार लागलेल्या नाद औटे यांना वैद्यकीय सुत्रांनी उपचार सुरू असतांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.