नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोन दुचाकींच्या धडकेत जखमी झालेल्या ६६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात जेलरोड ते नांदूरनाका दरम्यान झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रत्नाकर मधुकर रायकर (रा.निसर्गनगर,नांदूरनाका) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार वृध्दाचे नाव आहे. रायकर बुधवारी (दि.१७) नाशिकरोड भागात गेले होता. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ते परतीचा प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. जेलरोड मार्गे ते नांदूरनाक्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना बुध्द विहार समोर अज्ञात मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने रायकर गंभीर जखमी झाले होते.
बेशुध्द अवस्थेत कुटुंबियानी त्यांना तातडीने जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले होते. दुस-या दिवशी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ.मनिष छाजेड यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.