नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात द्वारका परिसरात झाला होता. गेली चार दिवस जखमी महिलेवर उपचार सुरू होते. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनिता केशव गायकवाड (५० रा.मैत्रविहार कॉलनी,हनुमाननगर अमृतधाम) असे मृत महिलेचे नाव आहे. गायकवाड या गेल्या २९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास गोविंदनगरकडून बळी मंदिराच्या दिशेने आपल्या पतीच्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता.
द्वारका परिसरात धावत्या दुचाकीवर चक्कर आल्याने त्या पडल्या होत्या. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने श्रीसाई बाबा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. गेली चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी (दि.२) डॉ. अमित येवलेकर यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.