नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव मेडिकल कॉलेज जवळ भरधाव दुचाकी घसरल्याने ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत महिलेच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगिता दिलीप कडाळे (४७ रा.गिरणारे ता.जि.नाशिक) असे मृत विवाहीतेचे नाव आहे.
कडाळे या गेल्या बुधवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. नागलवाडीकडून सुकेणेच्या दिशेने कडाळे दांम्पत्य प्रवास करीत असतांना आडगाव मेडिकल कॉलेज भागात भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात योगिता कडाळे यांना गंभीर दुखापत झाली होती.
डोक्यास वर्मी मार लागल्याने सतिष ढिकले यांनी त्यांना तात्काळ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता शनिवारी (दि.२४) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ. काजल शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार बस्ते करीत आहेत.