नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी झाल्या. हा अपघात महामार्गावरील धात्रकफाटा भागात झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पसार झालेल्या इर्टीका कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूणा नंदकुमार भागवत (६०) व भाग्यश्री नंदकुमार भागवत (रा.निशांत गार्डन जवळ,धात्रकफाटा) अशी जखमी मायलेकींची नावे आहेत. दोघी मायलेकी गेल्या गुरूवारी (दि.१) आडगाव शिवारातील डी मार्ट मॉलमध्ये गेल्या होत्या. खरेदी करून दोघी जणी अॅक्टीव्हा दुचाकीवर एमएच १५ जीझेड ६२०५ डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.
धात्रकफाटा येथील श्री सिध्दी गणेश मंदिराजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०४ एफआर ४२०३ या इर्टींगा कारने दुचाकीस धडक दिली. या अपघात मायलेकी जखमी झाल्या असून याप्रकरणी भाग्यश्री भागवत यानी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.