शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात तरूणीसह दोन दुचाकीस्वाराचा मृत्यू

by Gautam Sancheti
मे 2, 2025 | 3:48 pm
in क्राईम डायरी
0
accident 11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अपघाताचे सत्र सुरूच असून, वेगवेगळया अपघातात तरूणीसह दोन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ, इंदिरानगर व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोडीवरील आरटीओ सिग्नल भागात बेदारक मालवाहू पिकअपने (एमएच १५ एचएच ७३०३) अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात जयश्री संजय सोनवणे (२३ रा. दिंडोरीरोड) या दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला तर हितेश संजय सोनवणे (३० रा.सदर), जयदेव लक्ष्मण महाले (२१ रा.साईदर्शन कॉलनी,धुळे ) व घनश्याम भरत महाले (१९ रा. वरवंडी ता.दिंडोरी) आदी जखमी झाले आहेत. जयश्री व हितेश सोनवणे हे दोघे भाऊ बहिण गुरूवारी (दि.१) शालिमार येथे डबलसिट जात असतांना हा अपघात झाला. एमएच १५ सीई ०९७३ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना बाराच्या सुमारास ते दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नर भागात सिग्नलवर थांबले होते. यावेळी पाठीमागून बेदारक आलेल्या एमएच १५ एचएच ७३०३ या मालवाहू पिकअपने अनेक दुचाकींना धडक दिली. या अपघातात वरिल सर्व जखमी झाले असून त्यातील जयश्री सोनवणे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत हितेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पिकअप चालक अनिल मच्छीद्र साळवे (रा.रामेश्वरनगर,दिंडोरीरोड) याच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.

दुसरा अपघात पाथर्डी फाटा भागात झाला. या अपघातात विजय धोंडीराम सुर्यवंशी (३३ रा.सदाशिवनगर पाथर्डीफाटा) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुर्यवंशी बुधवारी (दि.३०) रात्री महामार्गाने एमएच १५ सीबी ३८६५ या दुचाकीवर आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. नयनतारा प्रोजक्ट समोरील सर्व्हीस रोडने ते प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ एचसी ३६४० या कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी भाऊ विक्रम सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

तर अरूण लक्ष्मण साळवे (४५) हे गेल्या १० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आपल्या मेव्हण्यांसमवेत दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. त्र्यंबकरोडने दोघे सातपूरकडून सिबीएसच्या दिशेने प्रवास करीत असतांना बांधकाम भवन भागात भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात साळवे गंभीर जखमी झाले होते. जिल्हारूग्णालया मार्फत त्यांना श्रीजी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन प्रभाकर गायकवाड (३६ रा.पंचशिल कॉलनी शेजारी शिवाजीनगर) यांच्या विरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कट मारल्याचा वाद…कारमधून उतरलेल्या दोघांनी बसचालकास केली बेदम मारहाण

Next Post

या गावातील उरूस यात्रा स्थगित; म्हणून घेतला प्रशासनाने निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Next Post
Untitled 4

या गावातील उरूस यात्रा स्थगित; म्हणून घेतला प्रशासनाने निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011