नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – मुंबई महामार्गावर वाडिव-हे येथे लियर कंपनी जवळ मोटर सायकल अपघातात एक जण गंभीर जखमी झाले. रविवारी दुपारी १.४५ वाजता हा अपघात झाला. नाशिककडून मुंबई कडे जाणारी मोटार सायकल जात असतांना विरूद्ध दिशेने जाणारी अज्ञात मोटर सायकलने कट मारल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन जणांपैकी एक जण गंभीर जखमी झाले. जखमीला तात्काळ नासिक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्यांचे नाव गणेश संतोष खर्चे (१७) असे आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिका सेवेने या जखमी रुग्णांना नेण्यात आले.