नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धावत्या दुचाकीवरून तोलजावून पडल्याने २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात पाथर्डी गावातील खंडोबा मंदिर परिसरात झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रोहित अशोक पवार (रा.महापालिका कार्यालयासमोर पाथर्डी गाव) असे मृत युवकाचे नाव आहे. रोहित पवार बुधवारी (दि.१२) रात्री आपल्या घर परिसरातून दुचाकीवर प्रवास करीत असताना ही घटना घडली. खंडेराव मंदिर परिसरात तो धावत्या दुचाकीवरून तोल जावून पडला होता. या घटनेत त्यांच्या डोक्यास व गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता मध्यरात्री उपचार सुरू असतांना डॉ. सुयश पवार यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार खांडेकर करीत आहेत.
………..
भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २० वर्षीय दुचाकीस्वार ठार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २० वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात नांदूरनाका ते तपोवन दरम्यानच्या सेलीब्रेशन लॉन्स भागात झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किरण प्रकाश गायकवाड (रा.रामटेकडी तपोवन) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गायकवाड गेल्या शनिवारी (दि.८) रात्री नांदूरनाक्याकडून तपोवनच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. सेलीब्रेशन लॉन्स परिसरात अज्ञात चारचाकीने दुचाकीस धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. बेशुध्द अवस्थेत कुटूबियांनी त्यास तात्काळ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. गुरूवारी (दि.१३) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.