नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत ७५ वर्षीय पादचारी ठार झाला. हा अपघात नाशिक पुणे मार्गावरील सेंट झेविअर शाळा भागात झाला. सदर वृध्द रस्ता ओलांडत होता. ट्रकचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शांताराम देवराम चंद्रमोरे (रा.जगतापमळा,तरण तलावाजवळ) असे मृत पादचा-याचे नाव आहे. चंद्रमोरे शुक्रवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास सेंट झेविअर शाळेसमोर रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. नाशिकरोडकडून द्वारकाच्या दिशेने भरधाव जाणाºया अज्ञात मालट्रकने त्यांना धडक दिली.
या अपघातात त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने चंद्रमोरे गंभीर जखमी झाले होते. मुलगा विश्वास चंद्रमोरे यांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले सता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक होलगीर करीत आहेत.