नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दोन दुचाकींच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात गंगापाडळी ते लाखलगाव मार्गावर झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागर वाळू गायकर (रा.गंगापाडळी ता.जि.नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. सागर गायकर हा युवक मंगळवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. गंगापाडळी ते लाखलगाव दरम्यानच्या पुलावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गायकर गंभीर जखमी झाला होता.
मामा विलास वलवे यांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.