नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळून २० वर्षीय तरूणी ठार झाली. हा अपघात मखमलाबाद म्हसरूळ लिंकरोडवरील म्हाळ््या वजन काटा भागात झाला. भरधाव दुचाकीवर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तन्वी उमाकांत गणोरे (रा.सावित्री निवास,राहू हॉटेलजवळ पेठरोड) असे मृत युवतीचे नाव आहे. तन्वी गणोरे ही युवती सोमवारी (दि.६) सकाळच्या सुमारास मखमलाबाद परिसरात गेली होती. दुपारी दीडच्या सुमारास ती आपल्या इलेक्ट्रीक दुचाकीवर परतीच्या प्रवासास लागली असता ही घटना घडली.
मखमलाबाद ते राहू हॉटेल दरम्यानच्या म्हाळया वजन काटा परिसरात भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जावून आदळली. या अपघातात तन्वी गणोरे ही युवती गंभीर जखमी झाली होती. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने वडिल उमाकांत गणोरे यांनी बेशुध्द अवस्थेत तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.