नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ६० वर्षीय पादचारी अनोळखी वृध्दा ठार झाली. हा अपघात पेठ फाटा सिग्नल भागात झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
६० वर्षीय अनोळखी महिला गेल्या २७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास पेठफाटा सिग्नल परिसरातून रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला होता. भरधाव अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली होती. याअपघातात वृध्दा गंभीर जखमी झाल्याने तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना गुरूवारी (दि.१२) सकाळी वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले.
याबाबत हवालदार जगताप यानी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.