नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत ८० वर्षीय वृध्द महिला ठार झाली. हा अपघात मिनाताई ठाकरे स्टेडिअम भागात झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वाहन चालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छबुबाई सजन सौंदाणे (रा.संत जनार्दन नगर,मिनाताई ठाकरे स्टेडियम जवळ हिरावाडीरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. सौंदाणे या रविवारी (दि.८) सकाळच्या सुमारास परिसरातील साई बाबा मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून त्या घराकडे पायी जात असतांना हा अपघात झाला. आई साहेब हॉटेल कडून भरधाव आलेल्या एमएच १५ जेडब्ल्यू १०१२ या चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात सौंदाणे या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मुलगा बंडू सौंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात सदर वाहनचालकाविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.