नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ७१ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात झाला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुणवंत जिवण वाणी (रा.हनुमाननगर,मालेगावरोड नांदगाव जि.नाशिक) असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे. वाणी गुरूवारी (दि.७) सकाळच्या सुमारास अशोकनगर येथून शिवाजीनगरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. बसस्टॉप जवळील महादेव मंदिराम्समोर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने वाणी गंभीर जखमी झाले होते. भाऊ दिलीप वाणी यांनी त्यांना तात्काळ सुयश हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. समिर भिरूड यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.
दोन तडिपाराच्या पोलीसांनी वेगवेळया भागात मुसक्या आवळल्या.
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या दोन तडिपाराच्या पोलीसांनी वेगवेळया भागात मुसक्या आवळल्या. ही कारवाई औद्योगीक वसाहतीसह पंचशिलनगर भागात करण्यात आली असून याप्रकरणी सातपूर व भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तुषार रविंद्र सावंत (२२ रा. के.के.वाघ कॉलेज मागे,दुर्गानगर पंचवटी) व अरबाज उर्फ सोनू रफिक बेग (२८ रा.डॉ.आंबेडकर पुतळ््या मागे,पंचशिलनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपाराची नावे आहेत. दोघांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्याच्या विरूध्द हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून अनुक्रमे एक व दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
पोलीस त्याच्या मागावर असतांनाच गुरूवारी (दि. ७) सावंत सातपूर एमआयडीसीतील शामसुंदर हॉटेल परिसरात तर बेग आपल्या राहत्या घरात मिळून आला. याबाबत शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ चे जमादार शंकर काळे व भद्रकालीचे अंमलदार जावेद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर व भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास हवालदार खरपडे व शेळके करीत आहेत.