नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड भागात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यात १६ वर्षीय मुलासह ६८ वर्षीय दुचाकीस्वार वृध्दाचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
विहीतगाव येथील अमोल अंबादास म्हस्के (१६ रा.कोठुळे मळा, मथुरारोड) या मुलाचा गेल्या ८ मार्च रोजी रात्री सौभाग्यनगर येथील युनियन बँकेच्या एटीएम परिसरात अपघात झाला होता. या अपघातात त्यास गंभीर दुखापत झाल्याने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मार्फत त्यास आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. गुरूवारी (दि.३) उपचार सुरू असतांना डॉ. पराग जयस्वाल यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.
दुसरी घटना रेल्वे ब्रिज भागात घडली. या घटनेत देवजी सटवा हरबा (रा.शिक्षक कॉलनी, शिवशक्तीनगर जेलरोड) यांचा मृत्यू झाला. हरवा गुरूवारी (दि.३) सायंकाळी नाशिकरोडकडून सिन्नर फाट्याच्या दिशेने आपल्या मोपेड एमएच १५ जेयू ४९६६ दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. रेल्वे ब्रिज परिसरात पाठीमागून भरधाव येणाºया मालट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात हरबा गंभीर जखमी झाले होते. गजन गवळी यांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ.के सोनार यांनी त्याना तपासून मृत घोषीत केले. दोन्ही घटनांप्रकरणी पोलीस दप्तरी वेगवेगळया नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.