नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालवाहू टेम्पोने दिलेल्या धडकेत ३१ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात राऊ ते मखमलाबाद मार्गावरील इरिगेशन कॉलनी भागात झाला होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकूळ दिनकर बरफ (रा.गोदावरीनगर,गंगापूरगाव) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. बरफ गेल्या शुक्रवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास म्हसरूळ मखमलाबाद लिंकरोडने आपल्या दुचाकीवर एमएच १५ ईटी ४५११ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कामावरून ते आपल्या घराकडे जात असतांना राऊ हॉटेल ते मखमलाबाद दरम्यानच्या एरिकेशन कॉलनी भागात भरधाव मालवाहू टेम्पोने एमएच १५ सीके ७६६० दुचाकीस जोरदार धडक दिली.
या अपघातात बरफ गंभीर जखमी झाले होते. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि.१०) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पत्नी रंजना बरफ यानी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.