नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यात लाचखोरीची कीड खोलवर रुजली आहे. त्यातच आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात मोठा मासा गळाला लागला आहे. तब्बल ४ लाखांची लाच मागणारा तालुका कृषी अधिकारीच एसीबीला सापडला आहे. अण्णासाहेब हेमंत गागरे (वय ४२ वर्ष, तालुका कृषी अधिकारी (वर्ग २ राजपत्रित), सिन्नर तालुका (अतिरिक्त कार्यभार निफाड तालुका) रा. प्राइड ग्लोरी अपार्टमेंट, नाशिक रोड, नाशिक) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर एमआयडीसीमध्ये एका उद्योजकाचा शेती यंत्रे व अवजारांचे उत्पादन कारखाना आहे. त्याने उत्पादित केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते. परंतु या उद्योजकाने उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे लाचखोर गागरे याने भासवले. उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता लाचखोर गागरे याने या उद्योजकाकडे तब्बल ४ लख रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती अखेर २ लाख रुपयांची लाच घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. लाचेचा पहिला हफ्ता ५० हजार रुपये घेताना गागरे हा एसीबीच्या पथकाला सापडला आहे. याप्रकरणी गागरेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी
DySP अभिषेक पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो. 8888881449
सापळा पथक*-
ASI सुखदेव मुरकुटे, PN मनोज पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक- 02532578230, 02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .
Nashik ACB Trap Raid Bribe Corruption