नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महावितरण कंपनीचा लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. सचिन माणिकराव चव्हाण असे या लाचखोराचे नाव आहे. तो घोटी वैतरणा विभागात सहाय्यक इंजिनिअर आहे. त्याने ४० हजारांची लाच मागितली होती. आणि आता याप्रकरणी एसीबीकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचा वॉटर प्युरिफिकेशन प्लान्ट आहे. या व्यक्तीला त्याच्या इलेक्ट्रिक मीटरवर वाढीव लोड मंजूर करुन हवा होता. त्यासाठी त्याने महावितरण कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी या व्यक्तीला लाचखोर चव्हाण भेटला. त्याने या कामासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने यासंदर्भात सापळा रचला. आणि अखेर ४० हजाराची लाच घेताना लाचखोर चव्हाण रंगेहाथ पकडले गेला. याप्रकरणी चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सापळा अधिकारी
DySP अभिषेक पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो. 8888881449
सापळा पथक
ASI सुखदेव मुरकुटे, PN प्रणय इंगळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मार्गदर्शक
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक- 02532578230, 02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .*
Nashik ACB Trap Bribe MSEDCL Engineer Corruption