नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अणुजीव सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. वैभव दिगंबर सादिगले (वय ४८) असे या लाचखोराचे नाव आहे. २ हजाराची लाच घेताना तो रंगेहाथ सापडला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचा केटरिंग व्यवसाय आहे. तसेच, हा व्यवसाय नोंदणी केलेला आहे. इतर तीन संस्थांचेही ते केटरिंग व्यवसाय करतात. या चारही संस्थांच्या केटरिंग व्यवसायाकरिता पाणी वापरतात. या पाण्याचे एकूण चार नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत देण्यात आले होते. याबाबत पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी लाचखोर सादिगले याने शासकीय फी व्यतिरिक्त प्रत्येक पाणी नमुन्याचे ५०० रुपये मागितले. म्हणजेच चार नमुन्यांचे एकूण २ हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीने सापळा रचला. अखेर त्यात लाचखोर सादिगले अडकला. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सापळा अधिकारी
मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.न. 9921252549
सापळा पथक
पो. ना. प्रविण महाजन,
पो. ना. नितीन कराड,
पो. ना. प्रमोद चव्हाणके
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.*
दुरध्वनी क्रमांक- 02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४
Nashik ACB Trap Bribe Corruption Lab Assistant Crime