नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तीस लाख रूपयांची लाच स्विकारणा-या जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी बुधवार (दि.१४) पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. तर पन्नास हजारांची लाच घेताना अटक केलेल्या मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एका बाजार समितीच्या निवडणुकीत कायदेशीर पद्धतीने निवडून आलेल्या संचालकांविरोधात सहकार विभागात दाखल दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी लाच घेण्यात आली. तीस लाख रुपये घेताना अटक झालेला उपनिबंधक सतीश खरे २० मेपासून मध्यवर्ती कारागृहात आहे.
तर, एका निलंबित मुख्याध्यापकाच्या बाजूने न्यायाधिकरणाने निकाल दिल्यानंतर त्याला नियुक्ती देण्यासाठी शाळेला आदेशित करण्यासाठी ५० हजारांची लाच घेण्यात आली. याप्रकरणी महापालिकेच्या तत्कालीन शिक्षण प्रशासनाधिकारी सुनीता धनगर आणि लिपिक नितीन जोशी मध्यवर्ती कारागृहात होते.
यापैकी धनगर यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि.१२) सुनावणी पूर्ण झाली. तर, खरेच्या जामीन अर्जावरील सुनावणी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, धनगरांकडे असलेली बेहिशेबी मालमत्ता आणि पैसे यांसह इतर पुराव्यांमुळे त्यांच्यावर अटी-शर्ती लागू झाल्या आहेत.
Nashik ACB Satish Khare Sunita Dhangar Court