नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये लाचखोरीला ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधक हा क्लास वन अधिकारी तब्बल ३० लाखाची लाच घेताना सापडला आहे. आणि आता नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाची शिक्षणाधिकारी सुनिता धनगर आणि लिपिक नितीन जोशी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. त्यामुळे नाशिकच्या लाचखोरीची राज्यभरात चर्चा होत आहे.
नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि शिक्षण विभागाचा लिपिक नितीन जोशी यांना लाच घेताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हे दोघे सापडले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून ही मोठी आणि गोपनीय कारवाई करण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी धनगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका निलंबित मुख्याध्यापकाला कामावर पुन्हा रुजू करायचे होते. त्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी धनगर आणि जोशी यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. यातील लिपिक जोशी यांनी ५ हजार रुपये स्वीकारले तर ४५ हजार रुपये शिक्षणाधिकारी धनगर यांना स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने पकडले आहे.
यातील तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामि त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरण नाशिक येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील सदरील संस्था यातील तक्रारदार यांना सेवेमध्ये दाखल करून घेत नसल्याने त्यांनी यातील आलोसे क्रमांक एक यांच्याकडे सदरील संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. त्याकरिता यातील आलोसे क्रमांक एक यांनी सदर बाबत पत्र देणे कामी ५० हजार रुपयाची लाच मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली तसेच आलोसे क्रमांक दोन यांनी सदरील पत्र बनवण्याचे मोबदल्यात पाच हजार रुपयाची लाच मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
लाच घेणाऱ्यांची नावे
१) सुनिता सुभाष धनगर, वय- 57 वर्ष, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, मनपा नाशिक, राहणार- 801रचित सनशाइन उंटवाडी नाशिक ( वर्ग -२ )
२) नितीन अनिल जोशी, वय- 45 वर्ष, राहणार- फ्लॅट नंबर ८, पुष्पांकुर अपार्टमेंट, चव्हाण नगर, तपोवन, नाशिक ( वर्ग -३ )
सापळा अधिकारी*
*संदीप घुगे, पोलीस निरीक्षक,* लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.क्र- 8605111234
सह् सापळा अधिकारी
*गायत्री जाधव,* *पोलीस निरीक्षक,* लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक*-
पो. हवा. एकनाथ बाविस्कर
पो. ना. प्रकाश महाजन
पो. शि. नितीन नेटारे
*मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.क्रमांक – 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक. मो.क्रमांक – +919823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.क्रमांक – +919822627288
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच लँडलाईन क्रमांक
0253 – 2578230
0253- 2575628 वर संपर्क साधावा.
Nashik ACB Raid Education Officer Bribe Corruption