नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जवळपास दररोज एक लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडत आहे. आज मात्र, विभागाने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळेच मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला आहे. तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याच्यासह वकील एसीबीच्या पथकाला रंगेहाथ सापडला आहे. त्यामुळे सहकारसह सर्वच क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक विभागाच्या एसीबी अधिक्षकपदी शर्मिष्ठा वालावलकर यांची नियुक्ती झाल्यापासून मोठ्या संख्येने लाचखोर सापडत आहेत. यापूर्वी सापळे लावले जात असले तरी प्रत्यक्षात त्यामध्ये यश येत नव्हते. आता मात्र, वालावलकर यांच्या नेतृत्वात एसीबीच्यावतीने जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास दररोज एक लाचखोर जाळ्यात सापडत आहे. आता मात्र, एसीबीच्या पथकाला थेट जिल्हा उपनिबंधकच गवसला आहे.
सतिश भाऊराव खरे (वय ५७, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक वर्ग-१ रा. फ्लॅट नंबर २०१, आई हाईट्स, कॉलेज रोड), आणि शैलेश सुमातीलाल सभद्रा (वय ३२, वकील, रा. फ्लॅट नं ४, उर्वी अपार्टमेंट, सौभाग्य नगर, गंगापूर रोड) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. याच निवडणुकीत एका बाजार समितीमध्ये संचालकपदी एक जण कायदेशीर पद्धतीने व वैधपणे म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे निवडी विरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावर सुनावणी घेणे आणि त्याचा निकाल संचालकाच्या बाजूने लावण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा एजंट सभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती.
याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि लाचखोर खरे याने ही रक्कम त्याच्या कॉलेजरोड येथील राहत्या घरी स्विकारली. त्यामुळे तो रंगेहात सापडला. याप्रकरणी खरे आणि साभद्रा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी*
अभिषेक पाटील ,(पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो. 8888881449
*सापळा पथक*
ASI सुकदेव मुरकुटे, पोना मनोज पाटील, पोना अजय गरुड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
**मार्गदर्शक*
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
**श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .*
Nashik ACB Raid DDR Trap Bribe 30 Lakh