नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात लाचखोरीने उच्छाद मांडला आहे. त्यामुळेच जवळपास दररोज किंवा दिवसाआड लाचखोर सापडत आहेत. दोन दिवसापूर्वीच जिल्हा उपनिबंधक सतीश खरे हा तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला. त्यानंतर आज जिल्हा हिवताप अधिकाऱ्यासह दोन आरोग्य सेवक १० हजाराची लाच घेताना सापडले आहेत. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार लाचखोरांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
श्रीमती वैशाली दगडू पाटील (वय ४९, जिल्हा हिवताप अधिकारी, रा. स्टेटस रेसिडेन्सी गंगापूर),
श्री. संजय रामू राव, (वय ४६, आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप विभाग, रा. पाथर्डी फाटा)
श्री. कैलास गंगाधर शिंदे (वय ४७ वर्ष, आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप विभाग, रा. पांडव नगरी)
पाटील, राव आणि शिंदे यांनी आपल्याच सहकाऱ्याकडे १० हजाराची लाच मागितली. आजारी असल्याने हा सहकारी वैद्यकीय रजेवर होता. त्यानंतर तो कामावर हजर झाला. त्यानंतर त्यांचा पगार काढून देण्याचे मोबदल्यात हिवताप अधिकारी पाटील हिने १० हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणात राव आणि शिंदे हे सुद्धा सहभागी होते. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. आणि शिंदे हा १० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले गेला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
*सापळा अधिकारी*
श्रीमती साधना इंगळे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 9881473083
सापळा पथक*-
पो. हवा.सचिन गोसावी.
पो. हवा. प्रफुल्ल माळी.
पो. हवा. प्रकाश डोंगरे
मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .*
Nashik ACB Raid Bribe Corruption Trap