नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेची लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर हिच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर शिक्षण विभागाने तिला निलंबित केले. त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) धनगरच्या संपतीची चौकशी सुरू होती. त्याचा अहवाल आता आला आहे. याद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, धनगरकडे अधिकृत स्त्रोतांपेक्षा तब्बल ६४ टक्के अधिक बेहिशोबी संपत्ती सापडली आहे
नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर धनगर हिच्या मालमत्तेची उघड चौकशी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे सुरू होती. सदर उघड चौकशीमध्ये धनगर हिने 15/06/2010 ते दिनांक 03/06/2023 रोजी दरम्यानच्या कालावधीत शासकीय सेवेत लोकसेवक म्हणून कार्य केले. याच कार्यकाळात लाचखोर धनगर हिच्याकडे कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक तब्बल ९६ लाख ४३ हजार ८०९ रुपये एवढी अपसंपदा जमा केल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच केवळ १३ वर्षात लाचखोर धनगर हिने अधिकृत स्त्रोतांव्यतिरीक्त तब्बल ६४ टक्के अधिक अपसंपदा जमविली. याची दखल घेत एसीबीने तक्रार दिली आहे. त्यानुसार धनगर हिच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयम १९८८ चे कलम १३ (१) (ब ) / १३ ( २ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, राज्य सरकारने विधिमंडळात केलेल्या घोषणेनुसार, लाचखोर धनगर हिची अंमलबजावणी संचालनाकडूनही (ईडी) चौकशी केली जाणार आहे.
एसीबीचा अहवाल असा
चौकशी अधिकारी व फिर्यादी -* श्री. संदीप बबन घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक संपर्क क्रमांक – 8605111234
अपराध घडला तारीख वेळ व ठिकाण* – दिनांक 15/06/2010 ते दिनांक 03/06/2023 रोजी दरम्यानच्या कालावधीत शासकीय सेवेत लोकसेवक म्हणून कार्यरत असताना.
अपराध दाखल तारीख – 02/09/2023 रोजी.
अपसंपदा जमा – कायदेशीर ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक अशी 96,43,809 /- रुपये (64.83 टक्के) इतकी मालमत्ता.
मार्गदर्शक* –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक संपर्क क्रमांक – +919371957391
मा. श्री. माधव रेड्डी* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक. संपर्क क्रमांक – 9404333049
मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. संपर्क क्रमांक – +917977847637
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.
Nashik ACB Crime Education Officer Sunita Dhangar Bribe Corruption