नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २० लाखाची लाच घेणा-या सिन्नर व निफाडचे सहाय्यक निबंधक रणजीत पाटील व वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन वीर नारायण यांना न्यायालयाने १ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी आहे. बुधवारी एसीबीच्या पथकाने या दोघांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर गुरुवारी दोघांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने ही कोठडी सुनावणी आहे. दरम्यान एसीबीच्या पथकाने मुख्य आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना दीड लाख रुपये रोख मिळाल्याचे एसबीच्या अधिका-यांनी सांगितले.
बुधवारी सावकारी कायद्यातर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाटील याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकारात वरिष्ठ लिपीक प्रवीण अर्जुन वीरनारायण याचाही सहभाग होता. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. एसीबीच्या पथकाने टाकलेल्या या सापळ्यात लाचखोर निबंधक पाटील आणि लिपीक वीरनारायण हे अडकले. त्यांनी २० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.
मी सावकार नाहीच
सावकारी कायद्यातर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाटील याने २० लाख रुपयांची लाच ज्या सावकाराकडे मागीतली होती. त्या सिन्नरच्या तक्रारदाराने मी सावकार नसल्याचे सांगितले. माझा गुळाचा व्यवसाय असून मला सावकारीत अडकवण्याचा डाव होता असेही त्यांनी सांगितले.