नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचखोर हे अतिशय निगरगट्ट असतात असे बोलले जाते. त्याचा प्रत्यय आता आला आहे. बालकामगार हॉटेलमध्ये कार्यरत होते. त्यांचीही दया न आलेल्या एका महिला दुकान निरीक्षकाने थेट ५ हजाराची लाच घेतली. त्यामुळेच ती थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकली. निशा बाळासाहेब आढाव (वय ५३) असे लाचखोर दुकान निरीक्षिकेचे नाव आहे. हॉटेलमध्ये बालकामगार नोकरीस असल्याची बतावणी करुन गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तिने ५ हजाराची लाच मागितली. ५ हजार रुपयाचा रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार समक्ष स्विकारताना ती रंगेहात पकडली गेली आहे.
या कारवाईबाबत लाच लुचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की, नाशिक शहरातील एका हॉटेलमध्ये बालकामगार नोकरीस असल्याची माहिती कामगार विभागास प्राप्त झाली. त्याची शहानिशा करण्यासाठी दुकाने निरीक्षक निशा आढाव ही हॉटेलमध्ये आली. या हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याचा अहवाल देण्यासाठी लाचखोर आढाव हिने ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर हॉटेल मालकाने एसीबीकडे तक्रार केली. अखेर ५ हजार रुपये लाचेची रक्कम लाचखोर आढाव हिने कामगार उपायुक्त कार्यालयात स्विकारली. त्यामुळे ती रंगेहात सापडली. याबाबत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
लाचखोर अधिकारी – निशा बाळासाहेब आढाव. वय 53 वर्ष. दुकाने निरीक्षक, वर्ग 3. कामगार उपायुक्त कार्यालय, उद्योग भवन. राहणार, आकाशवाणी टॉवर, तिरुपती टाऊन, फ्लॅट नंबर 17, गंगापूर रोड, नाशिक
*सापळा अधिकारी –
अनिल बडगुजर, पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.न. 8999962057.
*सापळा पथक-
पो. ना. मनोज पाटील, पो. ना. अजय गरुड, म.पो.शि. शितल सूर्यवंशी
*मार्गदर्शक –
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय , ला.प्र.वि. नाशिक.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक- 02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४ .