अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक न करता अटकपूर्वक जामीन मंजूर करण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात लाच मागणार अहमदनगर येथील कोतवाली पोलिस स्थानकाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक अशोक पवार लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडला. मदत करण्यासाठी तीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून या अधिका-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा मावस भाऊ व त्याच्याबरोबर असलेले चार सह आरोपी यांचेवर कोतवाली पोलीस ठाणे, अहमदनगर येथे दाखल गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करता अटकपूर्वक जामीन मंजूर होणे कामी मदत करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचखोराचे नाव
विवेक अशोक पवार, वय- ३५ वर्ष, धंदा- नोकरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक, नेमणूक – कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर
*लाचेची मागणी – ३०,०००/- रुपये
तडजोडी अंती -२५,०००/- रुपये.
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचा मावस भाऊ व त्याच्याबरोबर असलेले चार सह आरोपी यांचेवर कोतवाली पोलीस ठाणे, अहमदनगर येथे दाखल गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करता अटकपूर्वक जामीन मंजूर होणे कामी मदत करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून गुन्हा.
*सापळा अधिकारी*
संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.क्र- 8605111234
*सापळा पथक*
पो. हवा. एकनाथ बाविस्कर
पो. ना. प्रकाश महाजन
पो. शि. नितीन नेटारे
मार्गदर्शक
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.क्रमांक – 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक. मो.क्रमांक – +919823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.क्रमांक – +919822627288
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच
लँडलाईन क्रमांक
0253 – 2578230
0253- 2575628 वर संपर्क साधावा.
Nashik ACB API Trap Bribe Corruption Crime