नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १७ शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे कनिष्ठ लेखाधिकारी किरण दराडे व कनिष्ठ सहाय्यक (लेखा) सचिन पाटील हे ११ हजाराच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे शिक्षक असून त्यांचे व इतर १७ शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांच्या सेवा पुस्तकासह एकूण १८ सेवा पुस्तके लोकसेवक किरण दराडे यांच्याकडे जमा केली. सदर १८ शिक्षकांची वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदार यांच्या समक्ष सुरुवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे ७०० रुपये याप्रमाणे १८ सेवा पुस्तकांचे १२ हजार ६०० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ११ हजार रुपयांची मागणी करून सदर लाचेची रक्कम लोकसेवक किरण दराडे यांच्या सांगण्यावरून सचिन पाटील यांनी सदरची रक्कम लाचेची आहे हे माहीत असताना देखील स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले.. त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
यशस्वी सापळा कारवाई**
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरूष वय- 51 वर्ष
- आलोसे-
1.किरण रंगनाथ दराडे वय-40 वर्ष कनिष्ठ लेखाधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद कार्यालय नाशिक.
- सचिन प्रभाकर पाटील वय 40 वर्ष कनिष्ठ सहाय्यक (लेखा )वित्त विभाग जिल्हा परिषद नाशिक
*लाचेची मागणी- 12600/-
तडजोडी अंती लाचेची मागणी- 11000/-
*लाच स्विकारली- 11000/-
*हस्तगत रक्कम- 11000/-
- लाचेची मागणी – दि.17/10/2024
*लाच स्विकारली – दि.17/10/2024
तक्रार:- यातील तक्रारदार हे शिक्षक असून त्यांचे व इतर 17 शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांच्या सेवा पुस्तकासह एकूण 18 सेवा पुस्तके लोकसेवक क्रमांक एक यांच्याकडे जमा केली होते सदर 18 शिक्षकांची वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदार यांच्या समक्ष सुरुवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे 700/-रुपये याप्रमाणे 18 सेवा पुस्तकांचे 12600/- रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती 11000/- रुपयांची मागणी करून सदर लाचेची रक्कम लोकसेवक क्रमांक एक यांच्या सांगण्यावरून लोकसेवक क्रमांक दोन यांनी सदरची रक्कम लाचेची आहे हे माहीत असताना देखील स्वीकारल्याने त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
*आलोसे यांचे सक्षम अधिकारी-मा. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक
*सापळा अधिकारी – श्रीमती मीरा वसंतराव आदमाने, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
*सापळा पथक – पो. हवा.पंकज पळशीकर ,पो.हवा.प्रमोद चव्हाणके, पो.हवा. संदिप वणवे