नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एबीबी इंडिया (ABB India) ने आज नाशिकमध्ये त्यांच्या नवीन अत्याधुनिक फॅक्टरीचे उद्घाटन करत स्वत:ची गॅस इन्सुलेटेड स्विचगियर (GIS) उत्पादन क्षमता दुप्पट केली. या फॅक्टरी मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी जीआयएस (GIS) उत्पादित केले जातील. ही उत्पादने वीज वितरण, स्मार्ट शहरे, डेटा सेंटर्स, परिहवन (मेट्रो, रेल्वे), बोगदे, बंदर, महामार्ग आणि इतर पायाभूत विकास सुविधा यांसारख्या विविध उद्योगांमधील ग्राहकांना सेवा देईल. दरम्यान, या प्रकल्पाच्या निमित्ताने नाशकात सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.
एबीबी (ABB) च्या सस्टेनेबिलिटी स्ट्रॅटेजी २०३० च्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने ७८००० हजार चौरस फूट क्षेत्रात विस्तार असलेल्या या नवीन फॅक्टरी मध्ये प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाच वापर केलेला असून रोबोटिक्स च्या साहाय्याने उत्पादन क्षमता आणि गुणवत्ते मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. सदर फॅक्टरी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौंसिल (IGBC) ने निर्धारित केलेल्या निकषांनुसार बांधण्यात आलेली असून पाणी व वीज याचा कमीत कमी वापर करून कमीत कमी कार्बन ऑपरेशन्स साध्य करण्यासाठी आरई१०० (RE100 – १००% नूतनीकरण योग्य वीज) चा अंगीकार करून अधिकाधिक पर्यावरण स्नेही वातावरणात सदर फॅक्टरी चे कामकाज चालणार आहे.
नवीन फॅक्टरीच्या उद्घाटनासह एबीबी इंडिया (ABB India) ने देशात PrimeGear™ ZX0 हे नवीन प्रॉडक्ट देखील लाँच केले आहे. हा इको-फ्रेंडली स्विचगियर एबीबी (ABB) च्या SF6-free ecoGIS™ प्रणाली वर निर्माण करण्यात येणार आहे – जे हरित, स्मार्ट आणि सुरक्षित भविष्याकडील वाटचालीस हातभार लावते. यामधील प्रबळ, सुसंगत डिझाइन २०% कमी उष्णता निर्माण करत ऊर्जा बचत करते आणि सुरक्षा वाढवते. ecoGIS™ ग्लोबल वार्मिंग ची तीव्रता कमी करते. PrimeGear™ ZX0 रिमोट मॉनिटरिंग सक्षम असून पारंपारिक स्विचगियरच्या तुलनेत २५% कमी जागा व्यापते. जीआयएस (GIS) मध्ये मार्केट लीडर असल्याने भारतातील एबीबी (ABB) ची ही फॅक्टरी स्थानिक उत्पादन प्रबळ करण्या बरोबरच कार्बन उत्सर्जन कमीत कमी करण्यास हातभार लावेल.
एबीबी इंडिया (ABB India) चे कंट्री हेड व मॅनेजिंग डायरेक्टर संजीव शर्मा म्हणाले, ‘‘एबीबी (ABB) अधिक शाश्वत आणि संसाधन-कार्यक्षम भविष्य सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहे. आम्ही बाजारपेठेत पर्यावरण पूरक पर्याय सादर करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून स्थानिक अभियांत्रिकीसह जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. या नवीन जीआयएस (GIS) फॅक्टरीमधून उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याप्रती आणि देशाच्या नेट झिरो प्रवासात योगदान देण्याप्रती एबीबी (ABB) ची कटिबद्धता दिसून येते.’’
एबीबी इंडिया (ABB India) च्या इलेक्ट्रिफिकेशन बिझनेसच्या डिस्ट्रिब्युशन सोल्यूशन्स डिव्हिजनचे सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट आणि हेड गणेश कोठावदे म्हणाले, ‘‘नाशिकमधील एबीबी (ABB) नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत पर्यावरण पूरक विद्युत उपकरणे निर्मित करण्यात अग्रेसर राहिली आहे. अश्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सदर नवीन पर्यावरण पूरक उत्पादन ते देखील पर्यावरण पूरक फॅक्टरी मध्ये उत्पादित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मेगासिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणूक वाढल्याने स्विचगियरची मागणी वाढत असून त्याची पूर्तता करण्या करीत अश्या सुविधा युक्त कारखान्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.’’
एबीबी (ABB) नाशिकमध्ये १९७८ पासून विद्युत वितरण उत्पादने आणि सोल्यूशन्सची व्यापक श्रेणी तयार करत असून 3 ठिकाणी असलेल्या प्लांट्स मधून सुमारे १०० हुन अधिक देशात हि उपकरणे व सेवा निर्यात केल्या जातात.
सुरक्षित, स्मार्ट व शाश्वत पद्धतीने जगाचे विद्युतीकरण करणारी एबीबी इलेक्ट्रिफिकेशन (ABB Electrification) स्रोतापासून सॉकेटपर्यंत इलेक्ट्रिकल वितरण व व्यवस्थापनामधील जागतिक तंत्रज्ञान अग्रणी आहे. जगामध्ये इलेक्ट्रिसिटीची मागणी वाढत असताना १०० देशांमधील आमचे ५०,००० हून अधिक कर्मचारी ग्राहक व सहयोगींसोबत सहयोगाने लोकांच्या कनेक्ट होण्याच्या, जगण्याच्या व काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणतात. आम्ही नाविन्यपूर्ण उत्पादने, सोल्यूशन्स आणि डिजिटल तंत्रज्ञान विकसित करतो, जे सर्व क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता आणि कमी कार्बन समाज सक्षम करतात. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात स्थानिक कौशल्यांना आणत आम्ही जागतिक ट्रेंडला आकार देतो व समर्थन देतो, ग्राहकांसाठी उत्कृष्टता प्रदान करतो आणि समाजाला शाश्वत भविष्यासाठी ऊर्जा देतो.
नव्या फॅक्टरीची वैशिष्ट्ये
● ही फॅक्टरी स्मार्ट ग्रीड साठी लागणाऱ्या उपकरणांची वाढती मागणी पूर्ण करेल.
● जागतिक व देशांतर्गत बाजारपेठांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक-इन-इंडिया’ला पाठिंबा देण्याप्रती एबीबी इंडिया (ABB India) ची बांधिलकी अधिक दृढ.
● ग्लोबल वॉर्मिंग चा दुष्परिणाम कमी करण्याची क्षमता असलेल्या PrimeGear™ ZX0 या नवीन उत्पादनाचे निर्माण करण्यात आले असून सदर उत्पादन पर्यावरण घातक SF6 गॅस मुक्त असेल.
Nashik ABB India New Switchgear Plant Started