नाशिक – जिल्ह्यातील मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्या संदर्भात, आज शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी वेतन पथक अधीक्षक व लेखा अधिकारी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना लेखी पत्र देण्यात आले होते. त्यांनीच बैठकीची वेळ दिलेली होती. तथापि जिल्हा मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ शिक्षक भारती व शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी बैठकीसाठी गेले असता, बैठकीसाठी कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. पुण्याच्या शिक्षण उपायुक्त श्रीमती मीनाक्षी शेवनकर शिक्षण विभागाच्या तपासणीसाठी आलेल्या होत्या. संतप्त झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली, व त्यांच्यासमोर नाशिकच्या शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचाराच्या कथा मांडल्या, व शिक्षण विभागाचा निषेध म्हणून त्यांच्यासमोरच यांच्या कार्यालयात ठीय्या आंदोलन सुरु केले. श्रीमती मीनाक्षी शेवनकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावनांची दखल घेत, उपस्थित अधिकाऱ्यांची सर्वांसमोर चांगलीच परखडपणे कान उघाडणी केली. पुराव्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणे सांगितली, श्रीमत सेवनकर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की हे संघटनेचे लोक काही माझ्याकडे स्नेहभोजन करण्यासाठी आलेले आहेत का, तुमच्या भ्रष्ट कारभाराचे दर्शन मला झाले आहे मी आता यांची चांगलीच कान उघाडणी करते हे तुमच्या मागे फिरतील अशी व्यवस्था करते असे त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले व यापुढे नाशिकचा शिक्षण विभाग कसा सरळ करते असेही त्यांनी सांगितले, ऐन वेळेवर गेलो असता त्यांनी आमची व्यथा ऐकून घेतली व त्यावर तात्काळ उपाययोजना केल्याने जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह आर डी निकम यांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशहा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाब भामरे कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, रईस अहमद, एजाज अहमद, नीलेश ठाकूर,त्रंबक मार्तंड सुनील भामरे,गोकुळ चव्हाण,साहेबराव देवरे, शंकर खैरनार, सचिन शेवाळे, जयेश सावंत,सचिन देशमुख,गोपाल पवार, यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनासाठी उपस्थित होते.